क्रिप्टो करन्सी म्हणजे नक्की काय ?

क्रिप्टोकरन्सी, क्रिप्टो-चलन किंवा क्रिप्टो हा एक बायनरी डेटा आहे जो एक्सचेंजचे/आर्थिक देवाणघेवाणीचे सुरक्षित माध्यम म्हणून काम करण्यासाठी डिझाइन केलेले आहे ज्यामध्ये वैयक्तिक नाण्यांच्या मालकीच्या नोंदी संगणकीकृत डेटाबेसच्या रूपात अस्तित्वात असलेल्या लेजरमध्ये ठेवल्या जातात. ज्यात व्यवहाराच्या नोंदी सुरक्षित ठेवण्यासाठी, सुरक्षित क्रिप्टोग्राफी वापरून अतिरिक्त नाणी तयार करणे आणि नाण्याच्या मालकीचे हस्तांतरण सत्यापित करणे याची सोय असते.

चित्र स्रोत - गुगल


काही क्रिप्टो योजना क्रिप्टोकरन्सी राखण्यासाठी व्हॅलिडेटर्स वापरतात. प्रूफ-ऑफ-स्टेक मॉडेलमध्ये, मालक त्यांचे टोकन संपार्श्विक म्हणून ठेवतात. त्या बदल्यात, ते भागवलेल्या रकमेच्या प्रमाणात टोकनवर अधिकार मिळवतात. साधारणपणे, या टोकन स्टेकर्सना नेटवर्क फी, नवीन काढलेले टोकन किंवा अशा इतर बक्षीस यंत्रणांद्वारे कालांतराने टोकनमध्ये अतिरिक्त मालकी मिळते.  क्रिप्टोकरन्सी भौतिक स्वरूपात अस्तित्वात नाही (जसे कागदी चलन, नाणी, इत्यादी.) आणि सामान्यत:  कुठल्याही  केंद्रीय प्राधिकरणाद्वारे प्रसिद्ध केली जात नाही. क्रिप्टोकरन्सी या सामान्यत: सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC) च्या विरोधात विकेंद्रीकृत नियंत्रणात असतात.  जेव्हा क्रिप्टोकरन्सी बाजारात आणली किंवा तयार केली जाते किंवा एका व्यक्ती, संस्था वा समूहाद्वारे ती बाजारात उतरवली जाते, तेव्हा ती सामान्यतः केंद्रीकृत मानली जाते. विकेंद्रीकृत नियंत्रणासह अंमलात आणल्यावर, प्रत्येक क्रिप्टोकरन्सी वितरित लेजर तंत्रज्ञानाद्वारे कार्य करते, विशेषत: ब्लॉकचेन, जे सार्वजनिक आर्थिक व्यवहारांचे डेटाबेस म्हणून काम करते.

2009 मध्ये ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणून सर्वप्रथम प्रसिद्ध करण्यात आलेली बिटकॉइन ही जगातील  पहिली विकेंद्रीकृत क्रिप्टोकरन्सी आहे. बिटकॉइन रिलीज झाल्यापासून, इतर अनेक क्रिप्टोकरन्सी तयार केल्या जात आहेत व दररोज प्रसिद्ध होत आहेत. आजतागायत जगात सुमारे ५००० पेक्षाही अधिक क्रिप्टोकरन्सी अस्तित्वात असून नवनव्या करन्सी आजही बाजारात येत आहेत.  यांचा मागोवा ठेवण्यासाठी व त्यांच्या बाजारातील किमतीची नोंद ठेवण्यासाठी कॉईनगेको  ही वेबसाईट अतिशय उपयुक्त आहे. 

क्रिप्टो करन्सी विकत घेण्यासाठी जगात विविध 'क्रिप्टो एक्स्चेंज' उपलब्ध आहेत जे शेअर बाजार प्रमाणेच क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करण्याची सोय उपलब्ध करून देतात. यातील सर्व मोठे एक्सचेंज भारतात उपलब्ध नसले, तरी बायनान्स हे जगातील सर्वात मोठे क्रिप्टो मार्केट भारतात आपली सेवा पुरवत असून, येथून आपल्याला P2P [UPI] व क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे क्रिप्टो करंसीची खरेदी करण्याची सोय उपलब्ध आहे.

सध्यस्थितित विविध सरकारे क्रिप्टो किंवा डिजिटल करन्सीला विरोध करताना दिसतात. टॅक्स चोरी, मनी लॉन्डरिंग, हवाला या प्रकारामध्ये क्रिप्टोचा वापर केला जाण्याची शक्यता असल्याने देशविघातक कार्यासाठी मदत म्हणून या मार्गाने पैसा भारतातून बाहेर आणि इतर जगातून भारतात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्रिप्टो ट्रान्स्फर ही वॅलेट टू वॅलेट होत असल्या कारणाने डिजिटल करन्सी कोण कोणास पाठवत आहे, एव्ही नोंद सरकारकडे राहत नसल्याने सुरक्षेच्या दृष्टीने सरकारला ते धोक्याचे वाटते. किंबहुना यासाठीच भारत सरकारचे क्रिप्टो करन्सी संदर्भात धोरण काय असेल , ते येत्या काळात सरकारकडून प्रसिद्ध केले जाण्याची शक्यता आहे. मात्र, क्रिप्टोचा जगभरात वाढता वापर पाहता, सरकार किती काळ डिजिटल करन्सीला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवू शकेल हे येणारा काळच ठरवेल.

Comments

Popular posts from this blog

बिटकॉइन क्रांती!